Pages

Home

मनोगत

२०१४ पासून माझा एक ब्लॉग चालू केला होता. थोडेफार लिहिताही होतो. पण २०१६ मध्ये माझा राष्ट्रसेवादलातील जुना सहकारी संजीव लाटकर भेटला. गप्पा मारताना माझे जागतिक प्रवासातील अनुभव त्याला सांगितले. त्याने हे अनुभव लिहिण्याचा आग्रह केला. मला ते जमेल असे वाटले नव्हते. पण केवळ त्याच्या आग्रहाखातर फेसबुकवर लिहित गेलो. माझ्या फेसबुक मित्रांनाही ते आवडले. मग लिहिण्याचा उत्साह दुणावला.
हे अनुभव एकाठिकाणी असावेत म्हणून एक वेगळा ब्लॉग चालू केला.
मी माझे प्रवासातील मजेदार अनुभव घरी मुलाला आणि पत्नीला सांगत असतो. मग तेही तो अनुभव लिहिण्याचा आग्रह धरतात. तो अनुभव अन्य मित्रांना भावेल असे मला वाटत नसते. पण माझ्या मुलाचा/पत्नीचा अंदाज बरोबर ठरतो आणि सर्वांना तो लेख आवडतो असे अनेक वेळा घडले आहे.
ठाण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हणे यांनी मला 'सिंदबाद' हे नाव दिले होते. तेच या ब्लॉगला ठेवले आहे.

माझे अन्य ब्लॉग 

  1. चिंतन 
  2. Karkhanis Consultants : Management & SAP related articles 
संतोष कारखानीस

Go to Index

No comments:

Post a Comment